दृष्टी

दुर्बल घटकांचा शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण, ग्रामविकास, आरोग्य, शैक्षणिक उपक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण

ध्येय

संबधित क्षेत्रात कार्य करणे, प्रशिक्षण शिबीरे आयोजित करणे आरोग्य शिबीरे, जनजागृती करणे

संस्थेचे उद्देश

१) आश्रम शाळा, बालक आश्रम शाळा, कन्याशाळा, अंध, अपंग, अस्तीव्यंग, मुकबधीर, मुलामुलींच्या निवासी शाळा चालविणे, नर्सरीशाळा, मुलामुलींचे वस्तीगृह, बालसदन, वृध्दाश्रम चालविणे.

२) तरूण, तरूणींना व्यवसायीक प्रशिक्षण देणे उदा. इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स, रेडिओ, डिव्ही, दुरूस्ती, शिवणकाम, विणकाम, भरतकाम, हस्तकला, चित्रकला, टंकलेखन, लघुलेखन, संगणक, स्क्रिन प्रिंटीग, हॉटेल मॅनेजमेंट, ब्युटी पार्लर, तसेच ड्रायव्हींग अदींचे व्यवसायीक शिक्षण व प्रशिक्षण देणे.

३) अंध, वृध्द, अनाथ, अपंग, मुकबधीर, अबला, विधवा, निराधार, यासाठी आधार केंद्र सुरू करणे, उपेक्षित घटकांना मदत करणे, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, एड्स व तत्सम दुर्धर रोगाच्या बाबतीत जनजागरण करणे, कुटूंब नियोजन, रक्तदान शिबीर, नेत्रदान शिवीर साक्षरता अभियान यासारखे उपक्रम राबविणे.

४) वैद्यकिय धर्मार्थ दवाखाने चालविणे, दुर्गम व ग्रामिण भागात झोपडपट्टीत वस्तीत आरोग्यविषयक व इतर विविध शिबीरे घेणे, असाध्य रोगांकरीता योग्य ती मदत करणे, महिलांना नर्सिंग अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देणे.

५) समाजात वाचनाची गोडी लागावी म्हणून सार्वजनिक वाचनालये उघडून ती चालविणे.

६) शाळा काढून तरूणांना व्यायामाचे महत्व पटवून देणे. क्रिडा विकासाच्या विविध योजन्ना राबविणे. वन व कृषी विकासासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी बोणी आडवा पाणी जिरवा कार्यप्रणाली अंमलात आणून उपलब्ध पाण्याचा पुरेपुर उपयोग करून घेणे व पाणलोट क्षेत्र विकासाच्या योजना मिळाल्यास संस्थेमार्फत राबविणे.

७) शेळी पालन, वराह्मालन, शहामृग-पालन, ससे पालन, कुकूट-पालन, रेपीम उद्योग, काडीपेटी उद्योग, खड्डू उद्योग, दालमिल, आईल मिल, पापड उद्योग, दुग्ध व्यवसाय इ. प्रशिक्षण देणे.

८) नैसर्गिक अपत्ती प्रसंगी व भूकंप ग्रस्त, दुष्काळ ग्रस्त व पुरग्रस्तांना अन्न, वस्त्र, निवारा, औषधी आदींची मदत करणे.

९) शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्राची माहिती पुरविणे नवनविन खताची, बियाणाची,औजाराची, लागवडीची इ. विषयी माहिती देणे, कृषि विषयातील तज्ञ मंडळीचे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबीरे, चर्चासत्रे आयोजित करणे.

१0) कृषि विषयक सर्व योजना राबविणे शेतीतील उत्पादन वाढविण्यांसाठी प्रयत्न करणे, कृषी अभियांत्रिकी, शेतकऱ्यांना जलसिंचन, ठिबक सिंचन वापरण्यास उत्तेजन करणे, शेण खत व कंपोस्ट खताचे महत्व सांगणे, गांडुळखत तयार करण्याचे प्रशिक्षण देणे, शेती विषयक समस्याचे निराकरण करणे, पाण्याचे नियोजीत वापर, सेंद्रिय शेतीचा प्रसार करणे.

११) कृषी विज्ञान केंद्र चालविणे, अंत्योदय योजना राबविणे, शालेय पोषण आहार योजना मिळाल्यास संस्थेमार्फत चालविणे, जलस्वराज प्रकल्प राबविणे, बालकामगार मुलांच्या विविध योजना राबविणे.

१२) केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना राबविणे. कृषी विषयक विविध योजना राबविणे.

१३) वधुवर सुचक केंद्र चालविणे, सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणे.

१४) शेणान्या समाजपयोगी योजना सबविणे, ग्रामीण विकास यंत्रणा, जागतिक बैंक प्रकल्प खात्यामार्फत राबविण्यात येणाच्या लोकहिताच्या योजना राबविणे, स्वयंसहाय्यता बचत गट-सुरू करणे, आणि-शासकीय योजना राबविणे.

१५) युवकांसाठी विविध कार्यक्रम राबविणे. नेहरू युवा केंद्र व मानव विकास मिशनचे विविध उपक्रम राबवणे.

१६) अपंगाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे.

१७) स्वयंरोजगार शिबीराचे आयोजन करणे.