विशाल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांद्वारे गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात ही संस्था विशेष अग्रेसर आहे. विशेषतः नवउत्साही अध्यक्ष श्री. भास्कर गुलाब उघडे यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली संस्थेने नवा जोम आणि दिशा प्राप्त केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिकाधिक विस्तारत असून, समाजातील दुर्बल घटकांसाठी विविध प्रकल्प आणि उपक्रम राबवून संस्थेने समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.